Breaking News

बहुजनप्रतिपालक, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


मुंबई केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप जेष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असे सांगितल्याचा दावा शिवसेना करीत आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्‍नावरुन शिवसेनेकडून भाजपाची कोंडी करण्यात येत असल्याची शक्मयता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या काही खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. मात्र, त्यांनी यासंदर्भात असमर्थता दर्शवली असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. जर मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य तीस भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.