Breaking News

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार : दानवे

पुणे: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी दिली. शिवसेनेने एकटे लढण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे भाजपला देखील स्वबळावर लढावे लागणार आहे. यावर बोलताना शिवसेना आणि इतर मित्रपक्ष एकत्र निवडणुका लढवू मात्र नाही आले तर त्यांच्याशिवाय लढून जिंकू असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अहमदनगरमधील छिंदमवर कारवाई केली आहे. शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन क रणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.