Breaking News

सावत्र बापाचा तेरा वर्षाच्या मुलीवर तीन वर्षापासून बलात्कार

पुणे,  - सावत्र बापाचा तेरा वर्षाच्या मुलीवर तीन वर्षापासून बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर पोलिसांच्या हद्दीतून उघडकीस आला. ही मुलगी शाळेत शांत आणि इतर मुलांपासून अलिप्त राहत असल्याने शिक्षकांना शंका आली. त्याबद्दल शिक्षकांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. त्यानंतर ती घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला. आपल्यावर होणा-या अत्याचारामुळे ही मुलगी कायम घाबरलेली आणि शांत असायची. शाळेतील तिचा हाच स्वभाव पाहून काही शिक्षकांना शंका आली. त्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली.