संघटनांचा वापर राजकारणासाठी केल्याने समाजाने त्यांना नाकारले - खंदारे
बहुजन लोक आंदोलन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव खंदारे याच्या अध्यक्षतेखाली कुकडी गेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, या संघटनेचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केल्याने लक्ष्मण ढोबळे याना समाजाने नाकारले परिणामी त्यांना मतदारसंघात ही जनतेने नाकारले. अशी घणाघाती टीका त्यांनी ढोबळे यांच्यावर केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात नोंदणीकृत बहुजन संघटना फक्त 65 आहेत. तश्या महाराष्ट्रात जात वार संघटना आहेत. हे मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच परवा सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त आम्ही ढोबळे यांच्यापासून वेगळे होऊन बहुजन लोक आंदोलन नावाची संघटना स्थापन केली. त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे नामदेव खंदारे तर कार्याध्यक्ष संजय कदम, महासचिव वसंत सकट हे आहेत. या संघटनेच्या माध्यमातून बहुजन चळवळीचा बेस बदलण्याची कामे सुरू आहेत. हे मोठ्या प्रमाणात षड्यंत्र चालू आहे. हे षड्यंत्र थांबवायला पाहिजे. यासाठी संघटना काम करणार आहे . रोज अनेक संघटना येतात पण त्या टिकत नाहीत. कारण परिवर्तन वादी संघटना तयार व्हायला पाहिजेत. विचार बदल न करता काम करता काम करत राहील. प्रश्न विचारण्यात साठी समाज तयार होणाऱ्या पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी अंकुश शिंदे अमोल चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर हजर होते