Breaking News

आमदार नगरसेवकांचे हक्क डावलत आहे - सुकदान


नेवासा (प्रतिनिधी ) नेवासा शहरातील पाकशाळा रस्त्यांचे कामासाठी आम्ही विशेष पाठपुरावा केला व शहरातील जेष्ठ नागरिकांचे हस्ते सोमवार,दि5फेब्रुवारी १८ रोजी आम्ही शुभारंभ ठेवला होता परंतु शहरातील नगरसेवक ,व सामान्य जनतेला याचे श्रेय जाऊ नये. म्हणून आमदारांनी पहाटेच्या अंधारात उदघाटन का केले? तसेच एवढी तत्परता शहराला 6 महिने गढूळ पाणी मिळत असतांना का केली नाही ? पाहुणा ठेकेदार यांच्याबरोबर कशी मिलीभगत आहे? हे आता या निमित्ताने शहरातील जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया नेवासा येथील क्रांतिकारी पक्षाच्या नगरसेवकानी दिली आहे .

नगर पंचायत विशेष रस्ता अनुदानातून नेवासा येथील श्रीरामपूर रोड ते पाकशाळा रस्त्याच्या सुमारे 19 लाख रुपये कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक रमूशेठ पठाण, विजय कावरे आहेर ,अशोक मोहिते अमृत फिरोदिया ,भैय्या कावरे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सकाळी 7 वाजताच हे उदघाटन केल्याने दिवसभर नेवासा शहरात याची मोठी चर्चा झाली.