Breaking News

मनसेचे प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात पालिकेत आंदोलन

पुणे, दि. 04, फेब्रुवारी - प्रस्तावित पाणीपट्टीच्या दरवाढी विरोधात मनसेने आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. तसेच पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी केल्या.

महापालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजू सावळे, अंकुश तापकीर, चंद्रकांत दानवले, सीमा बेलापूरकर, शांतिलाल दहिफळे, सुधिर भालेराव, संतोष यादव, हेमंत डांगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या विविध भागात अजूनही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यातच पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाली आहे.
शहरातील नागरिक अधिच शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, वाढीव विद्युत बील. त्यामुळे त्रस्त झाले आहेत. हे जटील प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्ताधारी कोणतेही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. असे असतानादेखील सत्ताधा-यांनी पाणीपट्टी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या दरामध्ये भरमसाठ दरवाढ करत असताना सहा हजार लीटर मोफत पाणी देण्याचे सत्ताधा-यांनी गाजर दाखविले आहे. याचा मनसे तीव्र निषेध करत असून प्रस्तावित दरवाढ थांबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना दिले आहे.