तिलारी घाट रस्ता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
सिंधुदुर्ग, दि. 04, फेब्रुवारी - तिलारी घाट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या मार्गवरून कोणत्याही क्षणी वाहतूक सुरु होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर कधी रविवारी तर क धी सोमवारी उद्घाटन करू असे म्हणत असले तरी रविवारी वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुणगंटीवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई जिल्हा दौर्यावर असल्यान रविवारचा आणि मंत्रालयीन बैठकीमुळे सोमवारचा उद्घाटन कार्यक्रमसुद्धा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे बेळगावहून सावंतवाडीला येताना तिलारी मार्गे याव आणि आजच उद्घाटन कराव असा क ार्यकर्त्यांचा आग्रह असल्यान उद्घाटन शनिवारी होईल अन्यथा आठवडाभर लांबणीवर पडेल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली.
गोवा, दोडामार्गमार्गे बेळगाव, कोल्हापूरकडे जाणारा तिलारी घाटमार्ग हा जवळचा रस्ता आहे. इतकी वर्षे तो खासगी असल्याने त्या मार्गावरून जाणारी वाहतूक चालक स्वतःच्या जोखमीवर करायचे. तिलारी घाटाच्या पायथ्याशी जलविद्युत केंद्र तर माथ्यावर ’तिलारी’ची कार्यालये विद्युत केंद्र उभारणीवेळी पायथ्याशी पोचायचे तर आंबोली, सावंतवाडीमार्गे दोडामार्ग आणि पुढे तिलारी वीजघराला जावे लागे. केंद्रासाठीचे साहित्य, मशिनरीने ने-आण करण्यासाठी तो मार्ग खूपच दूरचा आणि खर्चिक होता. त्यामुळे तिलारी प्रक ल्पधार्यांनी कोदाळीमार्गे वीजघराकडे जाणारा खासगी मार्ग घाटातून काध्लां तो हाच ! कालांतराने वीजनिर्मिती केंद्र पूर्ण झाले, पण रस्ता सुरूच राहिला. रस्ता तीव्र वळणावळणांचा, तीव्र चढउतारांचा आहे. एका बाजूला उंचचउंच कडा तर दुसर्या बाजूला खोल दरी. तरीही या रस्त्याने सावंतवाडी, चंदगड, कोल्हापूर आगाराच्या एस.टी.गाड्या ये-जा करत होत्या. अर्थात त्याला ना बांधकाम विभागाची परवानगी होती, ना आरटीओची. दरम्यानच्या काळात अनेक अपघात घाटात झाले. काहींचे प्राण गेले आणि लाखो रुपयांची वित्तहानीही झाली. तिलारी प्रकल्पाने साडेतीन कोटी रुपये रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी कोल्हापूर सार्वजिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आणि महिनाभरापूर्वी चंदगड विभागाने रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण सुरु केले. आता रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा आहे ती उद्घाटनाची.