मुंबई : नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये खेचला गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजेश मारू असे या 32 वर्षीय युवकाचे नाव असून तो आपल्या बहिणीच्या सासूला बघायला नायर रुग्णालयामध्ये गेला होता. यावेळी रुग्णाचा एमआरआय करण्यास सांगिण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण महिला आणि मेहुण्यासोबत राजेश एमआरआय रुमकडे निघाले. दरम्यान,राजेश पुढे होता आणि राजेशच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. ’मशिन अजून बंद आहे तुम्ही आत जाऊ शकता’, असे वॉर्डबॉयने सांगितले. पण जेव्हा राजेश आत गेला तेव्हा मशिन सुरू होत्या. मशिनने सिलेंडर सोबत राजेशलाही खेचून घेतले. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला.या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या युवकाने प्राण गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
एमआरआय मशिनने आत खेचल्यामुळे तरुणाचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:54
Rating: 5