Breaking News

दखल - देश पुन्हा फिरंग्यांनी ठेवला ओलीस

सत्ताकारण आणि कपट कारस्थान यांच्या दरम्यान असलेली रेषा गेल्या तीन वर्षात अगदीचपा पातळ झाली आहे. इतकी की या पातळ रेषेतून पारदर्शकतेची खरी व्याख्या भारतीयांना उमजू लागली आहे. अर्थात सत्तेला कपट नितीचा आधार घ्यावा लागतो हे खरे असले तरी या तीन वर्षात सत्तेवर असलेल्या मंडळींनी त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून नितीमत्तेची सारी लक्तरे खुंटीवर टांगली आहेत. नागडेपण काय असते, भोंगळं होण म्हणजे नक्की काय हे या सत्ताधारी मंडळींच्या निर्लज्ज वर्तनातून क्षणोक्षणी देशाला समजू लागले आहे. मुळात या मंडळींचा इतिहास अतिशय किळसवाणा आणि हीन आहे, माणूस, मानवता या गोष्टींना या मंडळींच्या जीवन धारणेत स्थान नाही. रोहींग्या हे थेट नरभक्षक आहेत तर ही मंडळी अप्रत्यक्षपणे मानवतेची शिकार करताता हाच काय तो फरक.

महत्वाचा मुद्दा हा आहे की, कपटाच्या राजकारणाला जेव्हा एका विशिष्ट धर्मवर्चस्ववादी कार्यक्रमाची जोड मिळते आणि त्यातून बंदिस्त संघटन मजबूत होत जाते तेव्हा अनियंत्रित दांभिक धर्मसत्तेचे कथित ठेकेदारांचा सुळसुळाट होतो. गेल्या तीन वर्षात हाच सुळसुळाट या देशाला ताप देत आहे.
अर्थात या मंडळीचा मुळ पिंड हाच आहे अगदी स्वातंञपुर्व काळातील या मंडळींच्या पुर्वजांनी ना या मातीशी इमान दाखवले ना या मातीतील भुमीपुत्रांना मान दिला. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतीबा फुले, भगतसींग राजगुरू, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या बहुजनांच्या महापुरूषांना या धर्माधांनी सतत सुळाच्या टोकावर ठेवले.
शिवशाही पासून पेशवाई पर्यंत या मंडळींनी सतत आक्रमक फिरंग्यांची सोबत करून या भुमीशी द्रोह केला. ब्रिटीश राजवटीतही या मंडळींच्या पिलावळीने आपली पातळी ढळू दिली नाही. अलिकडच्या काळात त्यांचाच वारसा चालविणारी पिलावळ भारत वर्षात हैदोस घालत आहे. सारी सत्ता केंद्रे कपट नितीने बळकावून या देशाला राजकीय दृष्ट्या गुलाम बनवले आहे. मानसिक दृष्ट्या हा देश हजारो वर्ष या मंडळींनी गुलाम ठेवला आहेच. गुलामगीरीच्या या साखळदंडांना तोडणार्‍या विद्वान सुधारकांना रस्त्यावर गोळ्या घालून मारले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी या अलिकडच्या काळात झालेल्या हत्या याच विचारसरणीने करून दांभिक धर्मवाद पुन्हा थोपविण्याचा कुटील प्रयत्न अधोरेखीत केले आहेत.
ही मंडळी केवळ एखाद दुसर्‍या मार्गदर्शक समाज धुरीणांची हत्या करून थांबतही नाही तर वेगवेगळ्या निमित्तांचे घोंगडे पांघरून सामुहीक हत्याकांड घडवून आणण्यात या मंडळींचा हातखंडा आहे. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तणाव निर्माण होऊन उसळणार्‍या दंगली असोत नाही तर दलित सवर्ण वाद या प्रत्येक भानगडीत हात स्थानिक मंडळींचे वापरले जात असले तरी मस्तक मात्र या मनूवाद्यांचेच आहे. या मस्तकातील सडक्या मेंदूतून निघालेला विखार सामाजिक वणवा पेटवत असल्याचे प्रत्येक वेळी सप्रमाण सिध्द झाले आहे. दादराचे गोवंश हत्येचे कथित प्रकरण असो नाही तर भीमा कोरेगाव कांड. हे सारे या कपट नितीचेच फलीत आहे.
गेल्या काही दिवसांतील घटनांमधून जे काही समाजचित्र, राजकारणाचे चित्र उभे राहिले त्यातून अनियंत्रित दहशतवादी संघटनांचे वेगळेच कारस्थान सुरू आहे. हे समजून घेण्यासाठी देशाला आता कुणा भाटी तत्ववेत्याची गरज नाही. पावलो पावली येत असलेल्या अनुभवातून हा निष्कर्ष देशाने काढला आहे.
या सर्व अनियंत्रित दहशतवादी संघटीत शक्तींचा कर्ता करविता कोण? या प्रश्‍नाचे उत्तरही देशाला समजले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वरून जेवढा दृश्य स्वरूपात दिसतो त्याच्या किती तरी अधिक पट त्याचे अदृश्य रूप घातक आहे. जेवढा दिसतो. गेल्या नऊ दशकांंचा संघाचा प्रवास पाहीला तर या दोन तीन वर्षात संघाची देशभरात झालेली वाढ अनाकलनीय आहे. आरएसएस केवळ सांस्कृतिक संघटना आहे असा आव आणणार्‍या या संस्कृतीचा मूळ पाया महाराष्ट्रातच रचला गेला. रा. स्व. संघाची स्थापना नागपुरात झाली आणि जेव्हा त्यांनी पुण्यात येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही नागपूरची संत्री पुण्यात खपणारी नाहीत अशी त्यांची हेटाळणी केली गेली. परंतु तरीही रा. स्व. संघाची वाढ जशी नागपुरातून झाली तशी ती पुण्यातूनही झाली.
सांस्कृतिक संघटना म्हणून स्वतः प्रसारीत करणार्‍या संघेष्ट्यांची राजकीय आकांक्षा लपून राहीली नाही. मात्र परंतु ही वाढ सलग, सरळ झाली नाही. मात्र त्या आकांक्षा लप विण्याचे कौशल्य प्रत्येक संघीत विकसीत केले गेले आणि या संघ जनांचा पुढे जाऊन जनसंघ जन्माला आला. आणि जनसंघ ते भाजपा हा प्रवास देशाला चांगला ठाऊक आहे. थोडक्यात आजही हा देश एका कुटील कारस्थांनी मस्तकांच्या आणि हस्तकांच्या ताब्यात ओलीस आहे, हे ओळखून नव्या स्वातंत्र्य लढ्याची रणशिंग फुंकण्यासाठी पुरोगाम्यांना जागे व्हावे लागेल. इतकेच.