Breaking News

डी. एस. कुलकर्णी व्हेंटिलेटरवर पोलीस कोठडीत कोसळल्यामुळे डोक्याला दुखापत

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे पोलीस कोठडीत तोल जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ससून रूग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. ससून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले आहे. 


रूग्णालयात कुलकर्णी यांचे सीटी स्कॅन, एमआरआय करण्यात आले. मात्र त्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आहेत. तणावामुळे त्यांचा तोल गेला असा असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी काढून घेतले. त्यानंतर त्यांना शनिवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डीएस कु लकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक केल्यानंतर त्यांना संध्याकाळी पुण्यात आणण्यात आले. पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले. शनिवारी सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी डीएसके यांनी हजारो कोटींच्या घोटाळा केल्याचे आरोप केला व दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, यांचे वय, त्यांना असणारा मधुमेहाचा त्रास याची माहिती डीएसकेंच्या वकिलांनी दिल्यानंतर डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. पण ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आले. त्यामुळे शुन्यातून आपले वर्चस्व निर्माण करणारे डीएसकें पुन्हा शुन्यात आल्याचे चित्र दिसत आहे.