Breaking News

शेेतकरी मेळावा न घेता उचलली लाखोंची बोगस बिले माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप

माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने दि.15 रोजी बाजार समितीच्या वतीने शेतकरी मेळावा जुना मोंढा येथे शेतकरी मेळावा झाला. असे कागदो पत्री दाखवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. दि.18 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्ला बोल यात्रेचे मोंढा मैदानाची बिले देण्यात आली. परंतु बाजार समितीच्या वतीने जुना मोंढा येथे कसल्याही प्रकारचा शेतकरी मेळावा आयोजित केलेला नाही. बोगस शेतकरी मेळावाच्या नावाखाली लाखो रूपयांचा अपहार बाजार समितीचे सचिव व सभापती यांनी केला असल्याचे आरोप बालाजी देवीदास यमगर यांनी केला आहे. 


जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या लेखी तक्रारात यमगर यांनी म्हटले आहे. गेल्या एक वर्षा पासुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सभापती बोगस कामे दाखवुन भ्रष्टाचार करीत आहेत. समितीच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याचे बनाव करुन लाखो रूपयांचा अपहार केला आहे. त्याच बरोबर नोकर भरती व पदोन्नती प्रक्रिया राबवित असताना नियामाप्रमाणे बाजार समितीने निवड प्रक्रिया राबविने साठी उपसमिती नेमुन जिल्हा सेवा योजना कार्यालयाकडुन यादी न मागविता तसेच राज्यस्तरीय वर्तमान पत्रात जाहीरात न देता उमेदवाराची निवड करतांना प्रत्यक्ष मुलाखाती कागदोपत्री दाखविण्यात आली नाही. ही निवड प्रक्रिया व पदोन्नती मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारातून झाली आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील आठवडी बाजार व इतर किरकोळ कापुस खरेदी करणारे व्यापारी कापुस खरेदीकरण्यासाठी परवाण्याची आवश्यकता असते. व्यापारांनी कापुस खरेदी परवाण्यासाठी रितसर मागणी केली असता सचिव यांनी 40 ते 50 व्यापार्यांचे प्रत्येकी 15 हजार रूपया अनामत रक्कम घेवुन पावती दिली नाही. कृषी पणन मंडळाचे कृषी समितीवर दिड कोटीचे थकबाकी असतांना बाजार समिती कर्मचार्यांचे जि.पी.एफ व सेवा निवृत्ती ग्रॅज्युटी ईत्यादी देणे बाकी असतांना पैशाची उधळ पट्टी करुन बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचे आपहार करीत आहे. या प्रकरणी बीड येथे जिल्हा उपनिबंधक आधिकार्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारणी समितीच्या कार्यकारी मंडळ बरखास्त करुन समितीच्या सचिवावर निलंबानाची कारवाई करावी. जेणे करुन निपक्ष चौकाशी होईल.