संगमनेर प्रतिनिधी :- पठार भागातील दळणवळणाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या वनकुटे ते भोजदरी तालुका हद्द या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी १ लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी दिली. ते म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकराव पिचड, आ. वैभव पिचड, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पठार भागात मागील १ वर्षापासून सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. ग्रामस्थांच्या मागणीमुळे व जि. प. निवडणुकीत ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाच्या पुततेसाठी हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. या रस्त्याच्या कामासाठी आ. वैभव पिचड यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. या कामाच्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी अजय फटांगरे यांच्या कामाचे कौतूक केले.
भोजदरी ते वनकुटे रस्त्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:15
Rating: 5