Breaking News

शिरुर-नगर खाजगीकरणा अंतर्गत शहरातील उड्डाणपूल वगळण्याच्या निर्णयाची चौकशी व्हावी


अहमदनगर/प्रतिनिधी ;- जिल्हयातील शिरुर - नगर या रस्त्याची निविदा काढण्यात आली होती. ती निविदा एका खासगी कंपनीने भरली होती. या निविदेमध्ये 2009 साली सक्करचौक ते कोठी रोड पर्यंत उड्डानपूलाच्या कामाची 14 कोटी रुपयांची निवीदा मंजूर करण्यात आली होती. मात्र संबंधीत ठेकेदाराने या उड्डाणपूलाच्या कामा व्यतिरिक्त इतर सर्व कामे आटोपून घेतले. मात्र उड्डाणपूल हा विषय बाजुला ठेवून पाच वर्षाने याच उड्डाणपूलाची रक्कम 75 कोटींवर येऊन  ठेवली असल्याचे दिसते. या प्रकाराच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने लवादाकडे दाद मागितली संबंधीत ठेकेदाराने निवेदेतील अटी व शर्तीनुसार 2009 रोजी 9 कोटी रुपयांना मान्य केलेली उड्डाणपूलाची निविदा 2014 ला 75 कोटी कशी झाली याबाबत खूलासा मागविला होता. सध्या नव्याने नगर शहरातून उड्डाणपूलाच्या कामांसदर्भात भाजपचे नेते प्रयत्न करत असल्याची अनेक बातम्यांमधून स्पष्ट होत आहे. मात्र या उड्डाणपूलाचे काम खासगीकरणातून वगळून एक प्रकारे उड्डाणपूलाच्या कामास विरोध करण्याचा प्रकार भाजपचे माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी सुरु केला आहे. याबातचे पत्रही खासदार दिलीप गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठविले असून या सर्व कामांची व पत्रव्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर टोलची वसुल 29 एप्रिल 2026 पर्यंत आहे असे असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.222 कल्याण - विशाखापट्टपणम हायवे हा रस्ता नगर शहरातून जाणार असल्याने सीनानदी व डीएसपी चौक या लांबीत उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रस्तावित असल्याने सदर उड्डाणपूलाचे खासगीकरणातून काम वगळण्यात येऊन राष्ट्रीय महामार्गाकडून सदर पूलाचे काम करण्यात यावे अशी संसद सदस्य दिलीप गांधी यांनी आपणाकडे 11 जानेवारी 2016 रोजी पत्राद्वारे केलेली आहे. त्या नुसार 1 सप्टेंबर 2016 रोजी कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग अहमदनगर याविभागाच्या प्रस्तावानुसार मुख्य अभियंता यांनी 29 डिसेंबर 2016 रेाजी शासनाकउे सदरचे उड्डाणपूलाचे खासगीकरणातून होणारे काम वगळण्याबाबत शासनाकडे विनंती करण्यात आली. यानंतर त्यांच्या मागणीला उत्तर देत रा.म.मंत्रालयात प्रकल्पाचे कामाचा टप्पा 2 मध्ये करावयाचे असे पत्र दिले होते. खा. गांधी यांनी उलट आपणाकडे खाजगी ठेकेदाराच्यामाफत सदरचे उड्डापूलाचे काम करुन घेण्याबाबत मागणी करणे आवश्यक असताना त्यांनी तसे न करता ते उड्डाणपूलाचे काम वगळून राष्ट्रीय महामार्गाकडून करण्याबाबत अग्रही का आहेत ? याचा बोध होत नाही. त्यांनी सदर ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी का केली नाही ? व त्याने मुदतीत पूलाचे क ाम सुरु केलेेले नाही म्हणून आवाज का उठविला नाही याबाबत जिल्यात विविध तर्क वितर्काना ऊत आला आहे. तसेच उलट सुलट चर्चा घडताना दिसत आहे. तरी या सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार होऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे.