मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग तिसर्या दिवशीही शेअर बाजारात घसरण सुरु आहे. नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली नाही. आतापर्यंत सेन्सेक्स तब्बल 500 अंकानी घसरला आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 347.9 अकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील 156 अंकांनी गडगडला. त्यामुळे सध्या बाजारात मंदीचं वातावरण दिसून येत आहे. एचडीएफसी 3.5 टक्के, इंडसइंड बँक 2.3 टक्के, एलअॅण्डटी 2.48 टक्के, बजाज फायनान्स 2.39 टक्के, अदानी पोर्ट्स 2.20 टक्के शेअर्स मध्ये घसरण सुरूच आहे.
दरम्यान, बाजार सुरु होण्यापूर्वीचे कल देखील घसरणीमध्येच पाहायला मिळाले. दुसरीकडे बँक निफ्टी 1.15 टक्के घसरला आहे. तर आर्थिक सेवामध्येही 1.6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टीतील 50 पैकी फक्त 14 शेअर तेजीत आहेत. तर बाकी 36 शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारात घसरण सुरुच 500 अंकांनी सेन्सेक्स गडगडला
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:46
Rating: 5