Breaking News

तिहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीला जामीन मंजूर !


शहरातील आखेगांव रोडवर 17 जुलै 2017 रोजीच्या तिहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी चंद्रभान भगवान नांगरे यास, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन देताना, या प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रभान भगवान नांगरे यांच्या विरोधात दोषारोप पत्रात प्रथमदर्शी कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत, कोणीही या प्रकरणाचा प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार नाही, त्याचबरोबर परिस्थितीजंन्य पुराव्यांची उणीव असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. संशयित आरोपी यांच्या वतीने अ‍ॅड. शरद नातू यांनी काम पाहिले.