Breaking News

पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्या चिपळूणची पाहणी करणार

रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - चिपळूणमध्ये पर्यटनाला चालना मिळावी आणि चिपळूण हे एक उत्तम पर्यटनक्षेत्र म्हणून उदयास यावे, यासाठी प्रयत्न करणार्‍या ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थेच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. राज्यातील नामवंत टूर-ट्रॅव्हल कंपन्यांचे सुमारे 35 प्रतिनिधी चिपळूणमधील पर्यटन आणि येथील सुविधा पाहण्यासाठी येत्या 23 ते 25 फेब्रुवारीला चिपळूणचा दौरा करणार आहेत.


ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. बॅकवॉटर फेस्टिवल, क्रोकोडाइल सफारी, खाद्य महोत्सव असे उपक्रम राबवून पर्यटकांना चिपळुणात आक र्षित करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकून राज्यभरातील पर्यटक चिपळुणात कसे येतील, यासाठी ग्लोबल टुरिझम संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. संस्थेचे रामशेठ रेडीज, संजीव अणेराव, धीरज वाटेकर, समीर कोवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, चिपळूणला डेस्टिनेशन चिपळूण बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यभरातील पर्यटक चिपळूणमध्ये आणण्यासाठी राज्यातील नामवंत टूर-ट्रॅव्हल कंपन्या व त्यांच्या ऑपरेटरशी संपर्क साधून होतो. आता या प्रयत्नांना यश येत आहे. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन इंडिया, ट्रॅव्हल एजंट असो सिएशन, पुणे, इंटरप्रयझिंग ट्रॅव्हलर असोसिएशन, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन आदी नामवंत कंपन्यांमार्फत काम करणारे प्रसन्ना टूर्स, ट्रॅव्हल मास्टर, गिरीकंद ट्रॅव्हल, ओम टूर्स, प ॅराडाईज मार्केटिंग, मिहिर टुरिझम, सीमास ट्रॅव्हल अशा कंपन्यांना पर्यटनासाठी चिपळूणला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला असून या ट ्रॅव्हलचे टूर ऑपरेटर प्रथम चिपळूणमध्ये येऊन येथील पर्यटनस्थळे, परिसर आणि पर्यटकांना आवश्यक सुविधांची पाहणी करणार आहेत. येत्या 23 ते 25 तारखेदरम्यान सुमारे 35 टूर ऑपरेटरचे प्रतिनिधी चिपळूणमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांना चिपळूण शहर, डेरवण शिवसृष्टी, गोविंदगड किल्ला, वाशिष्ठी खाडी क्रोकोडाइल सफारी, परशुराम मंदिर, हेदवी, वेळणेश्‍वर या ठिकाणच्या भेटी घडवल्या जाणार आहेत. तसेच स्थानिक टूर ऑपरेटर, स्थानिक पर्यटन प्रतिनिधी, हॉटेल मालक यांच्यासमवेत चर्चासत्र होईल. त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.