‘पिक अप प्लास्टिक डे’14 फेब्रुवारी रोजी
सिंधुदुर्ग, दि. 04, फेब्रुवारी - जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 14 फेब्रुवारी रोजी ’पिक अप प्लास्टिक डे’ आयोजित करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या कमी वापराबाबत जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात तालुकास्तरीय उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतींना प्रथम, दिवितीय आणि तृतीय असे गुणांकण करून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामपंचायतस्तर अशा तीन स्तरावर करण्यात येणार आहे. पिक अप प्लास्टिक कार्यक्रमाचे नियोजन हे समुद्र किनारा स्वच्छता क ार्यक्रमांप्रमाणे आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकाच वेळी करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन करत असताना प्लास्टिक कचरा ही मोठी समस्या आहे. प्लास्टिक वापर कमी व्हावा आणि प्लास्टिकला पर्यायी वस्तूचा वापर करण्यात यावा, याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ’पिक आप प्लास्टिक डे’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.अध्यक्षांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिक ारी दीपक चव्हाण उपस्थित होते.