Breaking News

विद्याधन योजना महापालिका गुंडाळणार ?


पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करून नंतर विद्याधन कार्डाद्वारे हे साहित्य या मुलांना देण्याचा प्रयोग महापालिकेकडून अवघ्या वर्षभरातच गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डाच्या वापरासाठी येणार्‍या तांत्रिक अडचणी, नगरसेवकांकडून साहित्य विक्रीत केला जाणारा हस्तक्षेप तसेच बॅकेच्या काही अडचणींमुळे मोठया दिव्यांचा सामना प्रशासनास करावा लागला असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.मागील वर्षी राज्यशासनाच्या आदेशानुसार, तत्कालीन शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर सुमारे 307 शाळा आणि एक लाख विद्यार्थी असलेले मंडळ महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आहे. हे मंडळ महापालिकेत आल्यानंतर त्याचे शिक्षण विभाग असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर प्रशासने दरवर्षी मुलांना दिले जाणारे गणवेश, तसेच शालेय साहित्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या पुढे थेट मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचवेळी तातडीने या योजनेची अंमलबजावणी केली गेल्यास साहित्य उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विद्याधन’ हे कार्ड उपलब्ध केले. त्यानुसार, प्रत्येक मुलाला हे एका बँकेच्या माध्यमातून हे विद्याधन कार्ड देण्यात आले.या कार्डवर हे पैसे देऊन त्या मुलांना कार्ड आणि पासवर्ड देण्यात आला. त्यानंतर जे विक्रेते महापालिकेने नि श्‍चित केलेल्या दरात साहित्य देण्यास तयार आहेत त्यांचे पॅनेल तयार करण्यात आले. या पॅनेलवरील विक्रेत्यांनी शाळेत मुलांना हे साहित्य देऊन त्याच वेळी कार्ड स्वॅपकरून हे पैसे दुकानदारांना दिले जात होते.