कुस्त्यांच्या आखाड्यात शिरापुरचे वर्चस्व, खंडोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी.
सालाबादप्रमाणे याही वर्षी रांधे येथील खंडोबा देवाची यात्रा भरली होती. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आले होते. यात्रेचे मुख्य आकर्षण कुस्त्यांचा आखाडा होता. यामध्ये अनेक नामवंत मल्लानी भाग घेतला. कुस्त्यांचे बक्षिस 300/-रुपये पासून ते 25,000/- पर्यंत तसेच चषक, घड्याळ ठेवण्यात आले होते. कुस्ती आखाड्यामध्ये शिरापुरच्या पहिलवानांनी आपले कर्तब व डावपेच दाखवून अनेक बक्षिस मिळवीले. कुस्ती पाहण्यासाठी मार्केट कमिटी सभापती प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, माजी सभापती मधुकर उचाळे, पं.स.सदस्या रोहीणीताई काटे, सरपंच वैशाली आवारी, सरपंच संतोष काटे, चेअरमन बाजीराव आवारी, अळकुटी सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब पुंडे, निघोज ग्रा.पं. सदस्य सचिन वराळ, सचिन साखला, माजी पं.स.सदस्य शंकर नगरे, सचिन लाळगे, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता भोसले, सुभाष भोसले, ठकाराम भंडारी, विठ्ठल कवाड, अर्जुन लामखडे, सखाराम झिंजाड, बाबाजी आवारी, गोविंद सरोदे, ग्राम उत्कर्ष मंडळ मुंबई, त्रिमुर्ती ग्रुपचे सदानंद आवारी, विजय आवारी, कैलास आवारी, रांधुबाई ग्रामविकास मंडळ महेश झिंजाड, अनिल आवारी, अजित आवारी, किरण आवारी, दिलीप गहाणडूले, स्वप्नील शेटे, अमोल आवारी, जयेश नढे,देवराम काटे, संतोष लामखडे, वरुण सोनवणे, संतोष सरोदे, भगवान पावडे, अनिल पावडे, गोरख सरोदे, प्रविण साबळे, मंगेश फापाळे, आप्पा काटे, अविनाश आवारी, पांडूरंग आवारी, संजय काटे, रामदास तात्या भोसले, शंकर सरोदे, रामदास आवारी, पोपट आवारी, विनोद फापाळे, राजेंद्र आवारी, भास्कर आवारी, अरिफ तांबोळी, शिवाजी झिंजाड, साईनाथ झिंजाड, सबाजी शेटे, अशोक आवारी, भिमा लामखडे, भिवसेन साबळे, शकील तांबोळी, विजु आवारी, प्रविण आवारी, बापु आवारी, अरुण शिंदे, गणेश आवारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
या आखाड्यातील मुख्य आकर्षण अहमदनगर येथील वैदुवाडीचा अपंग पहिलवान शिंदे याने या आखाड्यामध्ये यात्रा कमिटीला त्याची कुस्ती कोणत्याही पहिवानासोबत लावावी अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन एका पहिलवानासोबत त्याची कुस्ती 2,200/- रुपयांवर लावण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी हार किंवा जीत शिंदे पहिलवानासाठी 2,500/- रुपयांचे वैयक्तिक बक्षिस ठेवले. त्यांनतर कुस्ती सुरु झाल्यानंतर समोरील पहिलवानास अपंग शिंदे पहिलवानाने काही सेकंदात चितपट करीत कुस्ती निकाली केली. उपस्थित ग्रामस्थांचे व कुस्ती प्रेमींचे मने जिंकली. शिंदे पहिलवानास ग्रामस्थांनी व कुस्तीप्रेमींनी तब्बल 14,500 /- रु. वैयक्तिक बक्षिस देऊन त्याचा गौरव जिल्हा परिषद माजी सभापती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर उचाळे यांचे हस्ते करण्यात आला