Breaking News

कोर्ले-धालवली माध्यमिक शाळेने विद्यार्थ्यांना घडवली विमान सफर


सिंधुदुर्गनगरी - ग्रामीण भागातल्या मुलांना सहल ही एक पर्वणी असते. साध वनभोजन असले तरी मुल खूप खुश असतात. पण जर या मुलांची सहल चक्क विमानातून निघाली तर? हे घडलय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागातल्या कोर्ले - धालवली माध्यमिक शाळेने यावर्षीची शैक्षणिक सहल चक्क विमानातून काढून विद्यार्थ्यांचे गगनभरारी घेण्याच स्वप्न पूर्ण केले आहे.
ऑक्टोबर महिना उजाडला की सर्वच शाळामधील विद्यार्थ्यांना वेध लागतात ते शैक्षणिक सहलीचे. या सहली एस.टी, लक्झरी किंवा रेल्वेने काढल्या जातात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अतिशय दुर्गम भागातील कोर्ले-धालवली माध्यमिक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क हवाई मार्गे काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामीण भागातील आणि गरीब शेतकर्‍यांच्या मुलानी हवाई प्रवासाचा आनंद लूटला आहे.