Breaking News

विरोधकांकडून कोंडी ; मुख्यमंत्र्यांचा माफीनामा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरक ारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.


राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी के ली. संबंधित बाब ही गंभीर असून, आज त्यांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न होणे ही बाब गंभीर आहे. शिक्षणमंत्री तावडे यांना अनुवाद करावा लागला त्यामुळे संबंधितांवर क डक कारवाई करून त्यांना घरी पाठवले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्य्यक्षांकडे केली.यापुढे अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्यात येईल असे सांगतानाच या प्रकारणी त्यांनी सभागृहाची माफी मागितली. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. राज्याच्या इ तिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. आजचा प्रकार हा सर्वांना कमीपणा आणणारा आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुवाद करते वेळी अध्यक्ष सभापती यांची परवानगी घेतली होती का हा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.