Breaking News

‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांचा ‘सेबी’ हटाव महामोर्चा


मुंबइ - ठेवीदारांचे पैसे बुडविणार्‍या पर्ल्स कंपनीविराधोत सोमवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी देशभरातील गुंतवणूकदारांनी सेबी हटाव चा नारा दिला. कोट्यावधी ठेवीदारांचे पैसे बुडविणाऱ्या ’पर्ल्स’ (पीएसीएल) कंपनीविरोधात गेली अनेक वर्षे लढा देणार्‍या जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने सेबी (सेक्युरिटीज् अ‍ॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज एक लाखांहून अधिक गुंतवणूकदार देशभरातून आल्याची माहिती, जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने अध्यक्षा सुनंदा कदम यांनी दिली. पीएसीएल कंपनीच्या ऑस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून जवळपास 79 मिलीयन डॉलर्स (400 कोटी रुपये) तेथील कोर्टाच्या एस्क्रो अकौंटमध्ये जनलोक गुंतवणूकदार यांच्या दाव्यानुसार रोख रक्कम जमा आहे. परंतू, सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास दिरंगाई होत आहे. तसेच सेबीने पीएसीएल कंपनीच्या 6 कोटी गुंतवणूकदारांची व्याजासह रकमेच्या परताव्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे या गुंतवणूकदारांचा उद्रेक होऊन सेबीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर संपूर्ण भारतातून सेबीच्या मनमानी कारभारामुळे पीएसीएल सेबी हटाव आंदोलन करण्यात आले.