Breaking News

इराणमध्ये विमान कोसळून 66 लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : इराणचे प्रवासी विमान दक्षिण इराण भागात कोसळले असून, हे विमान 66 प्रवाशांना घेऊन निघाले होते. सर्वच्या सर्व प्रवासी ठार झाल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थानी दिले आहे. एटीआर-72 हे ट्विन इंजिन टर्बोप्रॉप विमान तेहरानहून यासूज विमानतळाकडे निघाले होते. हे विमान इस्फहान प्रांतातून जात असताना या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यामुळे या विमानाचे सर्च ऑपरेशन सुरू झाले. त्यात या विमानाचे अवशेष मिळाले. सेमिरॉम शहराच्या हद्दीत डोंगराळ भागात हे विमान कोसळले होते. हे ठिकाण तेहरानहून 620 कि.मी. अंतरावर आहे. हे विमान तेहरानहून यासूज चे 780 कि.मी. अंतरावरील शहराकडे निघाले होते. इराणीयन एअरलाइन्सचं हे विमान आहे. ज्या भागात हे क ोसळले तिथे दाट धुके होते. विमान कोसळण्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात रशियामध्ये असेच एक विमान कोसळले होते. त्यातही 70हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.