Breaking News

मुख्यमंत्री शेतकरी असल्याचे सिद्ध करावे - धनंजय मुंडे

जळगाव, दि. 21, फेब्रुवारी - हे फसवे सरकार असून त्यांनी जनतेला केवळ फसविले खोटे आश्‍वासन दिले. आम्ही ज्यावेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, मीही शेतकरी असून मी पाच पिढ्याचा शेतकरी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी तुम्ही शेतकरी आहात का, हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.


विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी आज 20 फेब्रुवारीला रावेरला बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. सर्वसामान्य जनतेचा राग, रोष या हल्लाबोल यात्रादरम्यान आम्ही पाहतोय, असेही ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेल्या आश्‍वासनाबाबत मुंडे यांनी टीका केली. कुठे गेले अच्छे दिन, कुठे केलेत 2 कोटी रोजगार, कुठे गेला आमचा शेतकरी, कुठे गेले प्रत्येकाच्या बँक खात्याचे पंधरा लाख असे अनेक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. हे सरकार केवळ जनतेला भोल्वान देत असून, यामुळेच सरकारवर जनता रुसली आहे, असा आरोपही आमदार मुंडे यांनी केला. मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी या सारख्या बड्याना पैसा बुडवणार्‍याना पन्नास हजार कोटी कर्ज कसे मिळते? त्यांना कर्ज कसे मिळते, हा प्रश्‍न त्यांनी केला. आणि आमच्या शेतकर्‍याला कोणतेही कर्ज घ्यायला गेले तर त्यांना आधार लिंक आहे काय, सात बारा आहे क ाय असे अनेक प्रश्‍न विचारले जातात हे का? असा सवालही त्यांनी सरकारला केला. आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ’फसवणीस’ असे संबोधले आणि हशा पिकला. त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावरही आरोप केला. शेतकरी कर्जमाफी देताना केवळ दीड लाख दिली आणि शब्द दिला सरसकट कर्जमाफी हे कसले सरकार, अशी टीका आ. मुंडे यांनी रावेरच्या सभेत बोलताना केला. मुख्यमंत्री तुम्ही सांगा शेतकर्‍यांना त्यांच्या पत्नीसह रांगेत उभे केले. असंख्य शेतकरी अर्ज करीत आहेत, की कर्जमाफी झालेली नाही त्यासाठी हे हल्लबोल आंदोलन आम्ही राबवीत आहोत, असे मुंडे म्हणाले.