Breaking News

पिंप्री लौकि येथे रासेयोचे शिबिर उत्साहात

प्रवरानगर प्रतिनिधी '- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, लोणी कृषी महाविद्यालयावतीने पिंप्री लौकि येथे आयोजित केलेल्या राष्टीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर उत्साहात पार पडले, अशी माहिती प्राचार्य डॉ. जी. बी खंडागळे यांनी दिली. उदघाटनप्रसंगी पिंप्री लौकी गावच्या सरपंच अलका गीते, कृषी महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सचिन गोंदकर, प्रा. रमेश जाधव आदी उपस्थित होते.

या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिक व शिवार भेटी, सांस्कृतिक तसेच व्यक्तिमत्व विकासाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. संदीप पठारे, प्रा. प्रविण गायकर, प्रा. राहुल विखे आणि सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.