Breaking News

सांगलीत राष्ट्रवादीकडून गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध

सांगली, दि. 04, फेब्रुवारी - आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केंद्र शासनाने सादर केलेल्या दिशाहीन व फसव्या अर्थसंकल्पाचा सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आज, शनिवारी गाजर वाटून निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे अभिनव आंदोलन क रण्यात आले.


युवकांना रोजगाराचे, शेतकर्यांना हमीभावाचे, तर सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा अखेरचा अर्थसंकल्पही गाजर दाख विणाराच ठरला आहे. केवळ निवडणुका नजरेसमोर ठेवूनच भल्या मोठ्या आश्‍वासनांची खैरात या अर्थसंकल्पाद्वारे केली गेली आहे. हा अर्थसंकल्प पूर्णत्वास जाणे अशक्य आहे. या अशा फसव्या अर्थसंकल्पाचा सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गाजर वाटून निषेध करण्यात आला.