Breaking News

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले खेळातही पुढेच --नरेंद्र घुले


भेंडा/प्रतिनिधी / - ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलेही विविध क्रीडा क्षेत्रात नाव कमकुवत आहेत. याचा आम्हाला सार्थ आभिमान आहे. खेळाडूंनी जिद्दीने व खेळाडू वृत्तीने खेळ केला पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं शिक्षणा बरोबरच खेळातही पुढेच असल्याचे वक्तव्य ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील क्रीडा प्रबोधिनीने आयोजीत केलेल्या 14 वर्षा खालील राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धाचे पारितोषिक वितरण माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.