नोटाबंदीनंतरही जिल्हा बँकेतील नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि बँकांची बाजू माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम हे मांडणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. पण केंद्र सरकारच्या काही निर्णयांमुळे या संस्था अडचणीत आल्या आहेत. नोटबंदीमुळे पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्या. राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकांतून सर्व नोटा बदलून दिल्या गेल्या. मात्र जिल्हा बँकांच्या नोटा बदलून देण्यासाठी नकार दिला गेला, असे शरद पवार यांनी सांगितले.
जिल्हा बँकाची बाजू अर्थमंत्री पी. चिदंबरम मांडणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:43
Rating: 5