Breaking News

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सूचनांचे स्वागत : पाशा पटेल


शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सर्व स्तरांतून येणाऱ्या सूचनांचे स्वागत असल्याचे मत राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ‘विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मूल्य प्रणाली’ या अभ्यासगटाचे प्रमुख पाशा पटेल यांनी आज व्यक्त केले.

येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान कॉप्लेक्स, पुसा येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासंदर्भातील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. पटेल बोलत होते. या परिषदेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील सविस्तर अभ्यासासाठी 7 गट बनविण्यात आलेले आहेत. यापैकी ‘विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी- मुल्य प्रणाली’ याविषयावरील समितीचे प्रमुख पाशा पटेल आहेत.

‘विपणन, कृषी-पुरवठा आणि कृषी-मुल्य प्रणाली’ शी संबधित विषयांवर पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेत सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशभरातील प्रातिनिधिक शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी माल वाहतुकदार, कृषी समिती, शीतगृह चालक, अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित, केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.