Breaking News

अग्रलेख - अन्याय पे चर्चा...!

केंद्रात मोदी पर्व सत्तारूढ झाल्यापासून चर्चा नावाचा ट्रेंड जोरकसपणे देशपातळीवर मुळ धरू लागला आहे.सोशल माध्यमांचे विखुरलेले जाळे या पर्वाच्या उत्थानात नको तितके योगदान देत असल्याने हा ट्रेंड सामाजिक हश टग बनला आहे.त्याच दिशेने महाराष्ट्रात अन्याय पे चर्चा नवा ट्रेंड भावनांच्या बाजारात दाखल झाला आहे.


गेल्या पंधरा वीस दिवसापासून अवघा सोशल मिडीया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे या ट्रेंडने भारावून गेले आहेत.चहा विकणारा चहावाला पंतप्रधान झाला अन् देशभर चहा पे चर्चा सुरू झाली.यातून नक्की निष्पन्न काय झाले हा संशोधनाचा विषय आहे.माञ अन्याय पे चर्चा आणि चाय पे चर्चा यात असलेला मुळ भेद या ठिकाणी महत्वाचा आहे.चाय पे चर्चा निव्वळ मनोरंजानाचं साधन ठरलं होती.अन्याय पे चर्चा या ट्रेंडचा हेतू आणि उद्दिष्ट वेगळे आहेत. महाराष्ट्रातील एक महापुरूष काळ कोठडीत डांबला गेल्याने अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता एका राञीत झोपेतून उठली आणि या कुल पुरूषाला काळ कोठडीतून बाहेर काढण्यासाठी चौकाचौकात अन्याय पे चर्चा या ट्रेंडला जन्माला घातले गेले. हे महापुरूष गेल्या जवळपास दोन वर्षापासून गजाआड आहेत.व्यवस्थेने त्यांच्यावर अन्याय केला असा या ट्रेंडचा भावनिक दावा आहे.अन्याय काय आहे? कुणी कुणावर केला? याचे स्पष्टीकरण माञ ट्रेंडच्या उदगात्यांना देता येत नाही. खरे तर या महापुरूषाच्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडल्यानंतर अन्याय पे चर्चा या ट्रेंड मागचा कुटील हेतू सहज लक्षात येतो.विधानपरिषद निवडणूकीत चिटींग करून विजयी उमेदवाराला न्यायालयीन संघर्षात पिसून काढणारे हे महापुरूष, मंञीपदाचा वापर हितचिंतकांसाठी करून सामान्य माणसाच्या हक्कांचा लिलाव करणारे कनवाळू युग पुरूषावरील अन्याय पे चर्चा,सार्वजनिक निधीवर दिवसाढवळ्या हात साफ करणारे सत्पुरूष,सामान्यांना थंडीवार्यात कुडकडत ठेवून महालाचा सहवासाची कोटी करणारे दयाळू व्यक्तीमत्व ,या व्यक्तीमत्वावर अन्याय झाला म्हणून महाराष्ट्र मन तळमळतय.या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा निर्धार करून व्यवस्थेला धडा शिकविण्याचा चर्चेकर्यांचा उद्देश त्यांच्या पातळीवर संयुक्तिक असू शकतो,माञ ज्या हेतूने हा ट्रेंड सुरू केला गेला तो हेतू या पध्दतीने साध्य होणार आहे का? की या ट्रेंडच्या माध्यमातून या महापुरूषांना आणखी अडचणीत आणण्याचा सुप्त हेतू या ट्रेंडने राखून ठेवला आहे? असे काही प्रश्‍न या ट्रेंडमध्ये सहभागी झालेल्या चेहर्यांकडे पाहिल्यानंतर समोर येतात. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थे अशा प्रकारच्या दबावतंञाचा कितपत परिणाम होऊ शकेल हा ही एक मुद्दा आहे.सकारात्मक परिणाम झाला नाही तरी नकारात्मक परिणाम म्हणजे दुष्परिणाम नक्की होऊ शकतो,याचे भान स्नेहींनी ठेवायला हवे