Breaking News

बागेतील गाणी कवितेच्या सिडीचे प्रकाशन

कवितेच्या बागेतील गाणी या सीडीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे मा. सभापती साहित्यिक, पद्मभूषण बाळासाहेब भारदे, यांच्या विचारांचे स्मारक असलेल्या शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयातील संगीत विशारद मच्छिंद्र मगर यांच्या विशेष प्रयत्नातून कवितेच्या बागेतील गाणी या (सीडीची) निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांना सुरेख श्रवणीय चाली बसवुन त्या संगीतबद्ध करण्यात आल्या आहेत. 


सिडीच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या या कविता कायम स्मरणात राहतील असा विश्‍वास या उपक्रमाचे मार्गदर्शक भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश भारदे यांनी व्यक्त केला. अमरेंद्र भास्कर साहित्य संस्था व भारदे साक्षरता प्रसारक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 27 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष ल. म. कडू साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चित्रकार यांच्या हस्ते या सिडी चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. संगीता बर्वे मंदार भारदे, माधव राजगुरु उपस्थित होते. बाळासाहेब भारदे शाळा समितीचे अध्यक्ष हरीश भारदे यांनी याचे प्रायोजकत्व स्वीकारले तर या सिडी च्या निर्मितीसाठी उमेश घेवरीकर, बाळासाहेब धावट, निलेश मोरे यांनी सहकार्य केले, अमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिक्षणप्रेमींकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.