ऐक्याच्या भुमिकेला बाधक भाषेचा वापर करु नये - थोरात
राहुरी / ता. प्रतिनिधी ;-रिपब्लिकन ऐक्याबाबत समाजहिताला बाधा पोहचेल असे वक्तव्य न करता प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्याचे शिलेदार व्हावे, कोण आठवले? मी ओळखत नाही असे जाहीरपणे सांगताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी समाजाच्या संघर्षासाठी कष्ट झेलून देशाच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवून येथील जातीयवादाला मुठमाती देण्यासाठी प्रयत्न करणार्या संघर्षशील नेतृत्वाची खिल्ली उडवू नये, अन्यथा रिपब्लिकन पक्ष आठवले गटही प्रत्युत्तर देवू शकतो असे रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाची शकले न होता ते एकत्र यावेत अशीच ना. आठवलेंची इच्छा आहे. मात्र राज्यात वारंवार ऐक्याच्या भुमिकेला बाधक भाषेचा वापर करुन संविधान निर्माणकर्त्यांचे वंशज मनुवादी व्यवस्थेला हातभार लावत आहेत कि काय अशी शंका वाटते, डॉ. प्रकाश आंबेडकरांनी समाजसंघटीत करावा त्यांचे सर्वच स्वागत करतील मात्र दलित नेत्यांविषयी तसेच समाजहिताला बाधा पोहचेल असे वक्तव्य करु नये, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच नगरजिल्हा दौर्यावर असताना ऐक्य व आठवलेंबाबत वक्तव्य करुन नाहक दलित चळवळीत संभ्रमावस्था निर्माण केली ऐक्याबाबत भुमिका मांडताना आंबेडकर नेहमीच बगल देत आले असून, त्यात आजचे वातावरण हे बहुजन समाजात भिमाकोरेगाव घटनेनंतर भितीदायक दहशतीचे आहे, समाजातील घटकांना एकत्र आणून त्यांना आधार न देता मनुवादी व्यवस्थेला बळ देणारे भाष्य करुन यात ते अधिक भर घालत असल्याचे त्यांनी या प्रसिद्धीत्रकात म्हटले आहे.नगरजिल्हा गेल्या दोन वर्षात जातीयवादी घटनानंतर राज्याच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर आला. सोनई, खर्डा, जवखेडा, शिर्डी या घटना समोर आल्यानंतर रस्त्यावर संघर्ष करण्यासाठी रिपब्लिकन आठवले गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व न्यायासाठी लढले तेव्हा डॉ. आंबेडकर व भारिप बहुजन महासंघ कुठे होता कालच्याही भिमा कोरेगाव घटनेवेळी सर्वाधिक आंदोलने रस्त्यावर उतरुन आठवलेंच्या नेतृत्वाखाली रिपाइंने केलेले आहेत, यानंतर कार्यकर्त्यांर गुन्हे दाखल आहेत. याकरिता डॉ. आंबेडकर यांनी प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी त्यांनी काय केले हे सांगावे, दलित संघटना व बहुजन चळवळीत समाजाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, त्यांचे स्वागतच होईल त्यांनी ऐक्याचे शिलेदार होवून सर्वांना सोबत घ्यावे व समाजावर होणारे जातीयवाद्यांचे हल्ले परतवून लावावे व बहुजन समाजाला संरक्षक भाषा करावी, समाज एकसंघ राहण्यासाठी पाऊल उचलावे, त्याचबरोबर ना. आठवलेंबाबत योग्य भाष्य करावे असेही प्रसिद्धीपत्रकांत म्हटले आह.