Breaking News

तीन वर्ष उलटूनही मारेकरी मोकाटच कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी निदर्शने

पुणे : क्रॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्ष उलटूनही अद्याप मारेकरी मोकाटच आहे. त्यामुळे मंगळवारी राज्यभरात कॉ्रमेड पानसरे यांचे मारेकरी मोकाटच असल्यामुळे पुणे कोल्हापूरासह राज्यभरात विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला.


डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणांत देखील तपास यंत्रणेला मारेकरी शोधण्यात अपयश आले आहे. त्याचप्रमाणे क्रॉमेड पानसरे यांच्या हत्येला तीन वर्ष उलटूनही अद्याप आरोपी मोकाटच आहेत. त्यामुळे राज्यभरात तपास यंत्रणेचा आणि राज्यसरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 
या हत्या प्रकरणातील दोन संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा नेमकं काय करतात, असा सवाल केला जातो आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 54 महिने पूर्ण झाली. तरीही या दोन विचारवंतांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. त्या विरोधात आज पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर निषेध करण्यात आला. याच ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, 93 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई रानडे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापुरात उमा पानसरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करुन पानसरेंच्या हत्येचा निषेध केला. त्याचबरोबर तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजप सरकारवरही कडाडून टीका केली.