Breaking News

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही ? सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारासाठी मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यां दोघांनी चिथावणी दिल्याचा आरोप असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही एक बोटे ला अद्याप अटक का केली नाही? असा सवाल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात आज मिलिंद एकबोटे यांच्या अटक पूर्व जामिन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 


मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे या दोघांविरोधात औरंगाबाद व पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, तरीही त्या दोघांना अद्याप अटक करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवलेले नाही. मिलिंद एकबोटेंच्या अंतरिम जामिनावर 14 मार्चला सुनावणी होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांच्याकडून मुकुल रोहतकी हे वकील आहेत तर सरकारी वकील निशांत कंटेश्‍वर आहेत अशीही माहिती मिळते आहे.
भीमा कोरगावमधल्या हिंसाचार प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांच्या जामिनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे. या काळात एक बोटेंना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदतवाढ होणार असली तरी दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात जी दिरंगाई होत आहे, त्याबद्दलही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. सरकारने या प्रकरणाचा तपास करुन गरज पडल्यास एकबोटेंना अटक करावी. या तपासात एकबोटे कसे सहकार्य करतात, यावर त्यांच्या जामिनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ असे कन्यायालयाने म्हटले आहे.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर जमावानं हल्ला केला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी आपण त्या ठिकाणी नव्हतो असा दावा एकबोटे यांनी के ला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने एक बोटेंना दिलासा दिला नाही त्यानंतर एकबोटेंनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.