Breaking News

महाराष्ट्रात पुन्हा गारपिटीचे सावट 23 व 24 फेबु्रवारी रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात गारपिटीचा अंदाज


मुंबई : आधीच गारपिटीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांचे पीकाचे नुकसान झाले असून, पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र व विदर्भात गारपिटीचे सावट आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात म्हणजेच 23 फेब्रुवारीला उत्तर महाराष्ट्रात आणि पश्‍चिम विदर्भात 24 फेब्रुवारीला गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. 
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गारपीटीने विदर्भ मराठवाडयाला झोडपले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे विदर्भातल्या गहू आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी काढणीला आलेली पिकं योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवावी असे आवाहनच हवामान खात्याने केले. उत्तर महाराष्ट्रात विशेषता द्राक्ष, कांदा पट्ट्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यात शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी, त्याचबरोबर धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादकांची मोठी तारांबळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या गारपिटीमुळे विदर्भातील शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता या गारपिटीतून तरी त्यांच्या पिक ांचे संरक्षण होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता.