Breaking News

आ. मुरकुटेंनी काढली ध्वज मिरवणूक


नेवासा /श.प्रतिनिधी/- नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ध्वजाची मिरवणूक काढली. नेवासा येथील जनसंपर्क संपर्क कार्यालयापासून ध्वज मिरवणुकीस प्रारंभ झाला. आमदार बाळासाहेब मुरकुटे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येऊन मिरवणुकीत प्रारंभ करण्यात आला. 
चौका-चौकात ध्वज मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. सदरची मिरवणूक एस.टी. स्टँड खोलेश्वर मंदिर, नगर पंचायत चौक, डॉ.हेडगेवार चौक,मारुती चौक मार्गे श्री मोहिनीराजांच्या मंदिरात आली. यावेळी आ. मुरकुटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने राजेंद्र मापारी व सुधीर चव्हाण नगरसेवक सुनील वाघ यांच्या हस्ते आ मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला.