Breaking News

श्रीपाद छिंदमच्या विरोधात नाशिकमध्ये निदर्शने


नाशिक,  - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानंतर अटकेत असलेला श्रीपाद छिंदम याच्या विरोधात आज नाशिक शहरात विविध ठिकाणी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र आता त्यांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान आंदोलनामुळे मेहेर चौकात आणि जिल्हाधिकारी क ार्यालय परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली झाली होती. यासंदर्भात धार्मिक श्रद्धेचा अपमान केल्याबद्दल, तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल छिंदमवर गुन्हे नोंदवावेत अशी मागणीही आंदोलनकर्त्या तरुणांकडून करण्यात आली. त्या अर्थाचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.