Breaking News

मूल्ये शिकवता येत नाहीत रूजवावी लागतात; परिसंवादात मान्यवरांचे मत


पुणे, - वेगाने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, त्यातून मुलांपुढे येणारी तंत्रज्ञानाने येणारी नवीनवी प्रलोभने, विभक्त व न्यूक्लिअर कुटुंब पद्धती, बदलती सामा जिक, आर्थिक परिस्थिती या सगळ्याच्या चौफेर मा-यामुळे नव्य नव्य समस्या मुलांबाबत तयार होत आहेत. त्यामुळे मुलांसारखेच मूल्य शिक्षण पालकांनाही आता शिक्षकांनीच बंधनकारक करून मूल्य शिक्षण द्यावे. मूल्यांचे केवळ शिक्षण न देता त्याचे हॅमरिंगच करावे लागणा आहे, असे परखड मत कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत रंगलेल्या परिसंवादात आज मान्यवरांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘सत्रात मूल्याशिक्षण काळाची गरजङ्क या विषयावरील परिसंवाद रंगला. या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक ज्योतिराम कदम, रमणबाग शाळेतील शिक्षिका सौ. चारूलता प्रभूदेसाई, कवी तथा मुंबई बोर्डाचे सचिव अनिल गुंजाळ, सौ. सुशिलाबाई वीरकर शाळेतील शिक्षिका स्मिता ओव्हाळ आदी सहभागी झाले होते.