कुणकेश्वर यात्रोत्सवाची जय्यत तयारी
सिंधुदुर्ग, दि. 04, फेब्रुवारी - दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने यात्रा नियोजनाच्या दृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. यात्रेमध्ये प्लास्टिक पिशवी विक्री आणि वापर करण्यास बंदी क रण्यात आली आहे.
यात्रोत्सवाच्या दृष्टीने येथील मंदिर परिसर, शुशोभिकरण, विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी ब ॅरीकेटींग आणि मजबूत रेलिंग अशी कामे सुरु आहेत. मंदिर आणि मंदिर परिसरात आवश्यक ठिकाणी कॅमेरा बसविण्यात आले आहेत. कुणकेश्वर बीचवरही सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.