Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी सामर्थ्यांची दृष्टी अजोड सागरी सामर्थ्य प्रथम शिवरायांनीच ओळखले


नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन करतो, या भूमीला माझा प्रणाम, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन आणि जेनपीटीवरील चौथ्या ट र्मिनलचं लोकार्पण करण्यात आलं. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. दरम्यान, अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकरच अवतरेल, असा दावाही मोदींनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्यांची दृष्टी अजोड असल्याचे कौतुकोद्गार देखील पंतप्रधान यांनी काढले. त्याचबरोबर वेळेत कामं पूर्ण होणारी नवी संस्कृती आता रुजू होत असल्याचं सांगत, त्यांनी भाजप सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. दरम्यान, या क्रार्यक्रमावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र बहिष्कार टाकला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत करण्यात आले.