Breaking News

ग्रामसेवकांपुढे विकासकामांचा पेच


आमच्या गावचे अमुक एक काम तुम्ही कुणाला विचारून केले ? तुम्ही रोज गावात का येत नाही ? माझे नाव लाभार्थी यादीत का आले नाही ? मला लाभ मिळणार नसेल तर मग दुस-या कोणालाही मिळू देणार नाही. अमुक योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला का ? यासह पाणी वेळेवर येत नाही, गटारी साफ होत नाहीत, अशा अनेक प्रश्‍नांचा भडिमार करून गोंधळ घालणे, आरोप - प्रत्यारोप, टेबलवरील कागद फाडणे , फेकून देणे असे चिञ पाहायला मिळाले ते गावोगावच्या ग्रामसभेत ! त्यामुळे अशा ग्रामसभा ग्रामसेवकांना डोईजड झाल्या आहेत. नेते मंडळी व ग्रामस्थांच्या प्रश्‍नांच्या भडिमारांमुळे ग्रामसेवकांपुढे विकासकामांचा पेच पडला आहे. शिवाय ते गावच्या चक्रव्युहात अडकल्याचे चिञ दिसत आहे. 

गावावर वचक !
एकेकाळी या ग्रामसेवकांचा गावावर वचक होता. ग्रामसेवकांच्या शब्दाला वजन होते. गावा-गावात त्यांना आदराचे स्थान होते. काही अपवादात्मक एखादा ग्रामसेवक कामचुकार असतो.

अधिकार वाढले ! 
केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायतींना जादा आधिकार प्रदान केल्याने खर्‍या अर्थाने पंचायत राज बळकट व सक्षम बनलेल्या आहेत. सध्या ग्रामपंचायतीचे अधिकार वाढले, निधी वाढला माञ वेगवेळ्या कायद्याच्या आसुडाने ग्रामसेवकासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना जेरीस आणले आहे. गावोगावची सुशिक्षित युवा पिढी आणि ग्रामसेवक यांचे जसे हाडवैर झाल्याचे दिसून येते. 
--तात्यासाहेब ढोबे. 
अध्यक्ष ग्रामसेवक युनियन