भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना आव्हांनाचा सामना करावा लागतो. पत्रकारांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कायदा, घरकुल योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींचा यात समावेश आहे. पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी २५ लाखांचा निधी शासन देईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. संचालन बबन मेश्राम यांनी केले तर आभार डी.एफ. कोचे यांनी मानले.