Breaking News

पायाभूत सुविधांमध्ये राज्य अग्रेसर; दहा वर्षात राज्याचे चित्र बदलणार

मुंबई : पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. येत्या दहा वर्षात राज्याचे चित्र बदलणार असल्याचा सूर मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणूक परिषदेत लावण्यात आलाआहे. या परिषदेच्या निमित्ताने अनेक परिसंवाद, चर्चा आयोजित करण्यात आल्या आहेत. या चर्चांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच गुंतवणूकदार उद्योजक सहभागी झाले आहेत.


राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे मजबुत करुन राज्यातील प्रगतीला चालना देण्यात येत आहे. समृद्धी महामार्गामुळे 14 शहरे जोडले जाणार असून या परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधीउपलब्ध झाल्या आहेत, असे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित पायाभूत सुविधांमधून विकास या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादाला एमएमआरडीए आयुक्त यु.पी.एस.मदान, उद्योजक विशाल वांचू, टकेना सकामोटा, संजय उबाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री मोपलवार यांनी केलेल्या सादरीकरणात राज्यात निर्माण होणार असलेल्या रस्त्यांच्या जाळ्याचे तसेच महत्वाकांक्षी अशा समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर माहिती दिली. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीसुमारे 200 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य करित असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई पुणे महामार्ग तयार करताना आलेल्या अडचणी आणि तयार झाल्यानंतर लक्षात येणार्‍या कमतरता यांचा सर्वंकष विचारकरून समृद्धी महामार्गाचे नियोजन करण्यात येत आहे.ज्या 19 ठिकाणांहून रस्ते एकमेकांना छेद देत आहेत तिथे अत्याधुनिक वसाहती निर्माण करण्यात येत आहेत. हा महामार्ग तयार होत असतांना आणि झाल्यानंतर30 हजार प्रत्यक्ष आणि 60 हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.