जुगार अड्ड्यावर पाचगणी पोलिसांचा छापा; 11 जणांसह लाखाचा मुद्देमाल ताब्यात
पाचगणी-खिंगर रस्त्यावर पॅराडाईज बंगल्यात भोरचा एक पुढारी जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती पाचगणी पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्याप्रमाणे केलेल्या कारवाईत रुपेश गोविंद कुखड, मोहन बाळकृष्ण गायकवाड, मारुती कोंडीबा जाधव, राजेंद्र असेलचंद भंडारी, प्रविण जयसिंग शेटे, सतिश किसन शेटे, मोहम्मद रफिक मुलाणी, तात्या बाबुराव पवार, निलेश प्रताप देशमाने, अशोक पांडुरंग शेटे, किशोर नंदकुमार आराळे यांना कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केली. त्यांचेवर मुंबई झुगार अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सपोनि तृप्ती सोनवणे यांच्यासह शशिकांत बर्गे, कृष्णा पवार, श्रीनिवास बिराजदार, एम. व्ही. सावंत, रविंद्र ठोंबरे, शिवाजी पांब्रे, प्रविण महागडे, सुरज गवळी, जितेंद्र कांबळे, प्रमोद फरांदे, मनोज जायगुडे, अभिजित घनवट, वैभव भिलारे आणि किरण चिकणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. थंड हवेचे ठिकाण आलेल्या पर्यटनक्षेत्रात या कारवाईमुळे खळबळ उडाली. उच्चभ्रूंचे डाव उधळण्याचे आव्हान खाकीसमोर उभे ठाकले असले तरी या कारवाईमुळे पाचगणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.