खारेपाटणमध्ये 5 दिवसापासून बीएसएनएल सेवा विस्कळीत
सिंधुदुर्ग, दि. 04, फेब्रुवारी - कणकवली तालुक्यात खारेपाटण पंचक्रोशीत बीएसएनएल दूरध्वनी सेवा पुर्णतः विस्कळीत झाली. सलग 4-5 दिवस इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे बँका, व्यापारी तसेच ग्राहक यांना बसला फटका बसलाय. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच काम करताना मुख्य ओएफसी केबल तुटल्याने हि समस्या निर्माण झाल्याच बीएसएनएल स्पष्ट केले.
खारेपाटण आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सुमारे दहा ते बारा गावामधली बीएसएनएलची सेवा सध्या पुर्णतः विस्कळीत झाली आहे. गेले दिड महिना या दूरध्वनी सेवेचा खेळखंडोबा खारेपाटण मध्ये सुरू असल्यामुळे इथले नागरिक तसेच व्यापारी, ग्राहक, बँका आणि सरकारी कार्यालये याना मोठा फटका बसलाय. या गैरसोयीमुळे ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. बीएसएनएल विरोधात केव्हाही ग्राहकांचा उद्रेक होऊ शकतो अशी परीस्थिती आहे. यात कहर म्हणून गेले 4-5 दिवस इंटरनेट सेवा तसेच फोन का ॅलिंग सेवा बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सलग 4 दिवस इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया , सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, व्यापारी, आशा विविध सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर पुर्णतः परिणाम झाला आहे. सरकारी कार्यालयांचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे.