दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद सुंजवाँमध्ये सुरू असलेले ऑपरेशन तब्बल 30 तांसानी संपले
श्रीनगर : जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथेे दहशतवादी आणि लष्कर यांच्यात अजूनही चकमक सुरू असून लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सध्या सुरू असून, या हल्ल्यात 5 जवान शहीद तर, भारतीय जवानांना 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले आहे. या दहशतवाद्यांना शाळेवर हल्ला करायचा होता. दुसरा शनिवार होता म्हणून शाळा बंद होती. यामुळे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला. शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. तसेच, ग्रेनेड ब्लास्टचा आवाज झाल्याची देखील माहिती आहे. हल्लेखोर अतिरेकी जैश ए मोहम्मदचे असून त्यांनी पंजाब सीमेवरून जम्मूत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक दोन काश्मिरी नागरिकांनी त्यांना जम्मूपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली अशी माहितीही सूत्रांनी दिली.
जम्मूच्या सुंजवाँमध्ये सैन्याच्या कॅम्पमध्ये सुरु असलेले ऑपरेशन 30 तासांनी संपले असून, चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीत पाच जवान शहीद झाले असून एका जवानाचे वडीलही हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. दहशतावादी हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन अधिकार्यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता दहशतवाद्यांनी सुंजवाँच्या आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. जवानांचे कुटुंबीय राहत असलेल्या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. सुंजवाँ कॅम्प हल्ला, दोन जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथे अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. सुंजावाँ ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल 3 हजार जवान आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर 150 घरे रिकामी करण्यात आली. रउफ असगर या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मौलाना जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा तो भाऊ आहे. अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेने दिली होती.
लष्कर प्रमुखांनी जम्मूत तळ
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहीद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 30 तासांनंतर ऑपरेशन समाप्त झाले. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली होती, यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा देखील केली.