Breaking News

अग्नी 2 ची चाचणी यशस्वी दोन हजार किमी मारा करण्याची क्षमता.


नवी दिल्ली : अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची मंगळवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन तब्बल 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा मार्‍याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे. भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे. पंधराच दिवसांपूर्वी भारतानं पृथ्वी 2 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्यात आता अग्नी 2 ती भर पडली आहे. ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली.