क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी सन 1848 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून देशातील कोट्यवधी मुलींना शिक्षणाची दारे खुली केली. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दांपत्याचे कार्य ही देशाच्या प्रगतीसाठी एक मोठी शैक्षणिक तसेच सामाजिक क्रांती होती, असे प्रतिपादन युवा नेते उमेश भालसिंग यांनी केले. वाघोली येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवार ( दि. 3 ) रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना उमेश भालसिंग बोलत होते. या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
