Breaking News

वाहतूक परवान्यातून बांबू देशभर मुक्त


महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशातही बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबूची वाहतूक आणि त्यापासुनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. महाराष्ट्राचा हा निर्णय देशपातळीवर स्वीकारल्या गेल्याचा आनंद असल्याचे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औद्योगिक उत्पादनातील बांबूचा वापर वाढवण्यावर आपण भविष्यात भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात बांबू बोर्डाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह बांबू बोर्डाचे सदस्य व वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.