वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह, पोलीस उपनिरीक्षक निलंबित
नवी मुंबई, दि. 25, जानेवारी - वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह, पोलीस उपनिरीक्षकाला नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. खोट्या गुन्ह्यात बिल्डरला अटक क रुन 5 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख व पोलीस उपनिरीक्षक संजय यादव अशी निलंबित करण्यात आलेल्याची नावे आहेत. सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश राऊत हे करीत आहे.
नेरुळ येथील कोटयावधी रुपये किंमतीचा भुखंड मेट्रो डेव्हलपर्सचे संचालक सुरेश जैन यांनी बनावट कागदपत्रे व बनावट वारसदाराच्या माध्यमातून बळकवाल्याचा आरोप केतन चुग यानी केला होता. त्युनसार तुर्भे एमअयाडीसी पोलिसांनी गत ऑक्टोबर महिन्यामध्ये मेट्रो डेव्हलपर्सच्या संचालकांसह इतरांवर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क रण्यात आला होता. त्यामुळे मेट्रो डेव्हलपर्सचे संचालक सुरेश जैन यांना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांनी अटक केली होती. सुरेश जैन जामिनावर सुटल्यांनतर केतन चुग यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याची तक्रार सुरेश जैन यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये केतन चुग, सुनिल भानुशाली, सन्नी लाहोरीया व पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांनी संगनमत करुन सुरेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल करुन सुरेश जैन यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच सुरेश जैन यांचा मुलगा हितेश जैन याला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले असल्याचे प्रथमदर्शनी गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्याच्या तपासाबाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता सुरेश जैन यांना त्याची निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी न देता व आरोपांबाबत पुरेसा पुरवा उपलब्ध नसतान हेतुपरस्पर अटक करुन सुरेश जैन यांच्यावर दडपन आणत केतन चुग व त्यांच्या साथीदारांना 5 कोटीची खंडणी द्याावी याबाबत त्यांच्यावतीने धमकावले. गुन्हातील सत्यता व पुरावे यांची पडताळणी न करता फिर्यादी केतन चुग यांनांना फायदा व्हावा या हेतून त्यांच्या फायदयासाठी गुन्हा दाखल करत तपासात गंभीर अनियमितता दाखवणे, त्यांचे हे वर्तन पोलीस खात्याला अशोभनीय असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख व पोलीस उपनिरीक्षक संजय यादव यांना शासकीय सेवेतून निलंबित क रण्यात आले आहे.